उरण दि.13: करंजा गावातील कोरोना पॉझिटिव्ह आकडा वाढत चालल्याने उरणकरांच्या भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
उरण येथील करंजा गावात कोरोना कोविड १९ चा आकडा वाढतच चालला आहे. आजच्या दिवशी येथे तब्बल ४४ कोरोना पॉझिटिव्हची भर पडली आहे.
उरणमध्ये करंजा गावातील सुरकीचा पाड्यात मागील रविवारी एकाच दिवशी २१ पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २७ पॉजेटीव्ह आढळले. काल ५ जण पॉझिटिव्ह आढळले तर आज ४४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
यातील ७ जण कोरोनामुक होऊन ते घरी आले आहेत.
त्यामुळे उरणमध्ये एकूण पॉझिटिव्ह आकडा १०५ पर्यंत पोहचला आहे. वाढत्या रुग्णांची संख्या पाहता येथे रेड झोन लागू झाला आहे.
