अलिबाग,दि.09: शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आदेशामधील कोविड-19 विषाणूचा प्रसार संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुसरावयाच्या कार्यपध्दती बाबत व करावयाच्या उपयायोजनेबाबत दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने प्रतिबंधीत (Containment Zone) क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे दि.07 ऑक्टोबर 2021 रोजी पासून मानक कार्यप्रणालीचा (Standard Operating Procedure) अवलंब करण्याच्या अधिन राहून सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी साथरोग अधिनियम, 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 तसेच शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचनेनुसार रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पुढील आदेश होईपर्यंत यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधामध्ये दि.07 ऑक्टोबर 2021 पासून प्रतिबंधीत (Containment Zone) क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे खालील बाबीच्या अधिनतेने व सोबत मानक कार्यप्रणालीचा अवलंब करून सुरु करण्यास मान्यता दिली आहे.

सर्व व्यावसायिकांनी तसेच पर्यटकानी यासंदर्भात शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आदेशाच्या मानक कार्यप्रणालीचा (Standard Operating Procedure) अवलंब करण्यात यावा. धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे उघडी राहण्याचा कालावधी संबंधित ट्रस्ट/बोर्ड/ प्राधिकरण याच्याद्वारे निश्चित करण्यात यावा व त्यानुसार निश्चित केलेल्या कालावधीसाठी सदर धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे भाविकांसाठी / अनुयायांसाठी खुली ठेवण्यात येतील. या ठिकाणी व्यक्तीनी आवश्यक किमान 6 फुट शारिरीक अंतर (Physicaldistance)बाळगणे,Handwash/Sanitizationकरणे, FaceMask वापरणे, ThermalScanning करणे बंधनकारक असेल, सर्व संबंधितांना आदेशापूर्वी स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया सहिता 1973 चे कलम 144 (4) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/आस्थापना शासनाने यापूर्वी लागू दंडात्मक कारवाईस तसेच भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270,271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सुसदर आदेशाची फौजदारी शिक्षेस पात्र राहील.

धार्मिक स्थळांच्या व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता मानक कार्यप्रणाली(Standard Operating Procedure):-

65 वर्षावरील व्यक्ती, गरोदर स्त्रिया धोकादायक आजार असलेली व्यक्ती (Persons with comorbidities) आणि 10 वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांना अत्यावश्यक बाबी शिवाय तसेच वैद्यकीय सल्ल्यानुसार आरोग्य विषयक यावाशिवाय अन्य कारणासाठी घराबाहेर पडू नये, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळे प्रार्थना स्थळाचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थानी संबंधितांना सूचीत करण्यात येत आहे. अशा ठिकाणी कोविड-19 चा प्रादूर्भाव धोका कमी करण्यासाठी सामान्य प्रतिबंधात्मक उपाययोजना ज्यामध्ये सर्वसाधारण सार्वजनिक आरोग्याच्या उपायांचा समावेश आहे. या उपाययोजनांचे सर्वांनी कामगार आणि अभ्यागत) कायम पालन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये खालील उपाययोजनांचा समावेश आहे.

      सार्वजनिक ठिकाणी किमान 6 फूट अंतर ठेवणे अनिवार्य आहे.

अ) फेस कव्हर (Face Cover)/ मुखपट्टी (Masks) वापरणे अनिवार्य आहे, (ब) दुपमानारित्या हात अस्वच्छ दिसत असले तरी वारंवार (किमान 40-60 सेकंदापर्यंतसाबणाने हात धुण्याचा सराव करावा. शक्य असेल तेथे अल्कोहोल आधारित हेन्ड सनिटायझसेचा (किमान 20 सेकंद) वापर करावा, क) श्वसन विषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. यामध्ये खोकताना /शिकताना काटेकोरपणे तोंड आणि नाकाचा रुमाल दुमडलेल्या हाताने टिश्युज् येथेरने झाकले जाईल तसेच टिश्युज् चे वेळीच योग्यरित्या विल्हेवाट लावावी, ड) सर्वांनी आरोग्याचे स्व-परीक्षण करावे आणि कोणत्याही आजाराची नोंद लवकरात लवकर राज्य व जिल्हा स्तरावरील हेल्पलाइनकडे करावी, इ) सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास (Spiting) संबंधित व्यक्ती/इसम शासनाने निश्चित केलेल्या दंडनिय कारवाईस पात्र राहील, ई) सर्वांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा.

 सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे यांच्या व्यवस्थापनाव्दारे खालील बाबींची पूर्तता करण्यात यावी-

प्रवेशद्वारावर हाताची स्वच्छता करण्यासाठी Hand Sanitizer/Sanitizer Dispenser आणि धर्मल स्क्रीनिंग (Thermal Screening)ची सुविधा अनिवार्य राहील, केवळ कोणतेही लक्षण नसलेल्या (Asymptomatic) व्यक्तींना प्रवेश अनुज्ञेय राहील, चेहऱ्यावर फेस कव्हर(Face Cover) /मुखपट्टी(Maales) परिधान केलेल्या व्यक्तींनाच प्रवेश अनुज्ञेय राहील,
कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भातील पोस्टर/स्टँडी/बॅनरर्स स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी लावण्यात येतील, कोविड-19 संदर्भातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी नियमितपणे लावण्यात येतील,
अभ्यागतांच्या प्रवेशाचे नियमन करण्यात यावे. एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेत प्रवेश द्यावयाच्या व्यक्तींची संख्या ही सदर इमारतीचा आकार तथील वायुवीजन व्यवस्था (Ventilation) इ. विचारात घेवून संबंधित ट्रस्ट/ मंडळ/प्राधिकरण हे स्थानिक प्राधिकरणाशी (उपविभागीय अधिकारी / महानगर पालिका इ.) समन्वय साधून निश्चित करतील, बूट/पादत्राणे हे शक्यतो स्वतःच्या वाहनानमध्येच ठेवावे आणि आवश्यकतेनुसार संबंधित व्यक्तींने स्वतः त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे यूट/पादत्राणे स्वतंत्र ठिकाणी ठेवावे,
वाहनतळाच्या ठिकाणी आणि परिसराबाहेर गर्दी होणार नाही या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करावे शारिरीक अंतराच्या निकषांचे पालन केले जाईल याची दक्षता घ्यावी, परिसरातील सर्व दुकाने, स्टॉल्स, चहाची दुकाने (कॅफेटेरिया), उपहारगृहे इ. ठिकाणी सामाजिक व अंतराच्या निकषाचे पालन करणे अनिवार्य राहील,
परिसरात शारिरीक अंतर राखण्याच्या दृष्टीने व रागेचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ठराविक अंतरावर विशिष्ट चिन्हे/निशाण्या (Marking) अरेखित करण्यात याव्यात, अभ्यागतांना आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी शक्यतोवर स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध होईल असे नियोजन करावे. या ठिकाणी प्रवेशासाठी असलेल्या रांगेत दोन व्यक्तींच्या मध्ये किमान 6 फूटाचे शारीरिक अंतर राहणे आवश्यक आहे. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील. प्रवेशाच्या वेळी नागरीकांनी आवारात प्रवेश करण्यापूर्वी आपले हात व पाय साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावेत. सदर ठिकाणी बसण्याची व्यवस्था करताना आवश्यक शारिरीक अंतर राखले जाईल याप्रमाणे नियोजन करावे. तसेच वातानुकूलन (Air Condition)/वायुवीजन (Ventiletion) याची व्यवस्था करताना सीपीडब्ल्यूडीच्या (CPWD) मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केले जाईल व सर्व वातानुकूलन उपकरणांचे तापमान 24-30 डिग्री सेल्सिअस या दरम्यान राहील तसेच सापेक्ष आर्द्रता ही 40-70 टक्के च्या श्रेणीत राहील याप्रमाणे उपाययोजना करावी. शक्यतोवर ताजी हवा उपलब्ध होईल व पुरेसे वायुवोजन (Ventiletion) उपलब्ध होईल याचे नियोजन करावे. पुतळे / मूर्ती / पवित्र पुस्तके इत्यादिना स्पर्श करण्यास मनाई असेल.

      अशा ठिकाणी मोठी गर्दी करुन धार्मिक संमेलने/धार्मिक सभा यापुढेही प्रतिबंधित राहतील.

 संक्रमणाचा प्रसार होण्याची संभाव्यता लक्षात घेता, सदर ठिकाणी शक्यतोवर रेकॉर्ड केलेली भक्ती संगीत /गाणी वाजविण्यात यावी. गायन मंडळ /गटांना परवानगी देण्यात येऊ नये. एकमेकांना अभिवादन करताना शारीरिक संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रार्थना करण्यासाठी सामाईक चटईचा वापर करणे टाळावे व भक्तगणांनी स्वत ची चटई किंवा बसण्यासाठी कापडी आसनाची व्यवस्था करावी व प्रार्थना झाल्यावर ती सोबत घेऊन जावी.
 धार्मिक स्थळी प्रसाद चढविणे किंवा प्रसाद वाटणे किवा पवित्र पाणी शिंपडणे इ. सारख्या बाबी करता येणार नाहीत. धार्मिक स्थळाच्या परिसरात स्वच्छता राखून वेळोवेळी वारंवार सॅनिटायझेशन करावे व शौचालये, हात-पाय धुण्याची जागा व बाथरुम इ. ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. धार्मिक स्थळाच्या व प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी व्यवस्थापनाद्वारे वारंवार स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे.. सदर ठिकाणची फरशी, जिने, पायया या वेळोवेळी स्वच्छ करण्यात याव्यात. अभ्यांगत आणि कर्मचाऱ्यांद्वारे सोडल्या जाणान्या फेस कव्हर /मारक /ग्लोव्हजची योग्य विल्हेवाट लावली जाईल याची सुनिश्चिती करण करावे. धार्मिक स्थळी व प्रार्थना स्थळी नियमित काम करणाऱ्या व्यक्ती तसेच कर्मचारी यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने सुरक्षा विषयक शिष्टाचार पालणे आवश्यक राहील. जास्त गर्दीने प्रभावित गटांमधील व्यक्ती व कर्मचारी यांनी कामावर रुजू होताना दर आठवड्यास कोविड-19 बाबत चाचणी करणे आवश्यक राहील.

शौचालये व खाण्याच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील सदर ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची संख्या वापराखालील पुरेशी जागा आणि अंतराबाबत शिष्टाचार सर्व धार्मिक स्थळी /प्रार्थना स्थळी ठेवला जाईल व त्याबाबतची हमी संबंधीत पोलीस विभाग जिल्हाधिकारी यांना देणे व्यवस्थापकांना बंधनकारक राहील.
परिसरात संशयित किंवा बाधीत व्यक्ती आढळून आल्या सत्या बाबतीत व अ) आजारी व्यक्तीला एखाद्या स्वतंत्र खोलीत किंवा विभागात इतरांपासून दूरविलगीकरण करून ठेवणे आवश्यक राहील. या व्यक्तीस चेहऱ्यावर मुखपट्टी (Masks)/ फेस कव्हर (Face Cover) उपलब्ध करून, त्या व्यक्तीची डॉक्टरांमार्फत तपासणी करावी. क) तात्काळ जवळच्या वैद्यकीय सुविधा रुग्णालय / क्लिनिक) पुरविणान्या यंत्रणेस त्वरित कळविण्यात यावे अथवा राज्य किंवा जिल्हा हेल्पलाईनशी संपर्क साधावा.तो पर्यंत त्यांना फेसमास्क देण्यात यावा. ड) नियुक्त केलेल्या सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणाद्वारे (जिल्हा आरआरटी / उपचार करणारे चिकित्सक) जोखीमेचे मूल्यांकन केले जाईल व त्यानुसार सदर व्यक्तीच्या बाबतीत पुढील नियोजन करावे. त्या व्यक्तीचे संपर्क तपासावे आणि परिसराचे निर्जंतुकीकरण इ. बाबी संदर्भात व्यवस्थापनामार्फत पुढील कार्यवाही सुरू करण्यात यावी. इ)जर सदर व्यक्ती संक्रमित असल्याचे आढळून आल्यास त्या जागेचे निर्जंतुकीकरण करावे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!