पनवेल दि.१६: पनवेलचे सुपुत्र स्वातंत्र्य सैनिक, हुतात्मा हिरवे गुरुजी हे गोवा मुक्ती संग्रामात 15 ऑगस्ट 1955 रोजी तेरेखोल किल्ला गोवा येथे शहीद झाले होते. त्यांच्या नावे दिला जाणारा “हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार” हा नामदेव शिंपी  समाज युवक संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने दरवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी गुरुजींच्या स्मृतिदिनी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे हे ४ थे वर्ष होते. यावर्षी हा पुरस्कार पुणे येथील प्रसिद्ध वास्तुतज्ञ व ज्योतिष विद्यावाचस्पती आनंद पिंपळकर यांना पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर यांचे शुभहस्ते पगडी, शाल व सन्मानचिन्ह देवून प्रदान करण्यात आला तसेच नामदेव शिंपी समाज युवक संघाचे अध्यक्ष, सिद्धेश हिरवे यांचे हस्ते सत्कारमूर्ती पिंपळकर यांना पुरस्काराचे प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. तसेच हु. हिरवे गुरुजी यांचे नातू नागेश हिरवे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती आनंद पिंपळकर यांना गोवा मुक्ती संग्रामाची पुस्तीका भेट दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस हुतात्मा हिरवे गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागत गीत तर हुतात्मा हिरवे गुरुजी पुरस्कार समिती नियोजन समिती प्रमुख चिन्मय हिरवे यांनी देशभक्ती पर गित गायले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष पी बी कुंभार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन खटावकर यांनी केले. बाबा पाडाळकर व नागेश हिरवे यांनी हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे कार्याबद्दल माहिती डेट हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे बलिदान कशाप्रकारे झालं याचे शब्दरूपी चित्र उपस्थितां समोर मांडलं. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात “शिंपी समाजातील कर्तुत्ववान, यशस्वी समाज रत्नाचा सन्मान हा पनवेलचे सुपुत्र हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे नावे पुरस्कार देऊन नामदेव शिंपी समाज युवक संघ करत आहे त्याचा अभिमान वाटतो” असे सांगितले. पुढे सत्कारमुर्ती आनंद पिंपळकर यांनी पुरस्कार स्वीकारल्या नंतर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिंपी समाजातर्फे मला मिळणारा हा पहिलाच पुरस्कार आहे आणि हुतात्मा हिरवे गुरुजी यांचे कार्य समाजापुढे येण्यासाठी मी प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगितले. युवक संघाचे अध्यक्ष सिद्धेश हिरवे यांनी पुरस्कार सुरू करण्या मागची संकल्पना व आजपर्यंत पुरस्कार प्राप्त व्यक्ती यांची थोडक्यात माहिती दिली. आनंद पिंपळकर यांचे कार्य विषयक माहिती ही चिन्मय हिरवे यांनी दिली. शेवटी उपस्थितांचे आभार निलेश काळे यांनी मानले.
या कार्यक्रमास परशराम गोडबोले अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटना, पनवेल, बाबासाहेब चिमणे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, पनवेल महानगरपालिका, रविंद्रजी कालेकर, अशोक खैरनार अध्यक्ष, राष्ट्रीय जनसेना पार्टी महाराष्ट्र प्रदेश, विनायक नाजरे अध्यक्ष, नामदेव शिंपी समाज पनवेल, सुभाष पांढरकामे उद्योजक, योगिता मांढरे, अरुणा हिरवे, समस्त शिंपी समाज परिषदेचे अध्यक्ष रामचंद्रजी होमकर हे प्रमुख पाहुणे तसेच प्रमुख वक्ते म्हणून ह भ प विशाल महाराज हाडवळे तसेच नामदेव शिंपी समाज पनवेलचे समाज बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!