उरण दि 6 (विठ्ठल ममताबादे) रात्री राजेंद्र तांडेल कळंबुसरे गाव -उरण यांच्या अंगणातील लाकूड फाट्यात एक अजगर असल्याचा रेस्क्यू कॉल फ्रेंड्स ऑफ नेचर, चिरनेर च्या हेल्पलाईन वर आला असता फ्रेंड्स ऑफ नेचर चे अध्यक्ष राजेश पाटील गेले असता त्यांना त्या लाकूड फाट्यात मोठा अजगर बसल्याचे आढळून आले. सर्प हाताळण्याचे विशेष कसब असणाऱ्या राजेश यांनी सापाला इजा न पोहोचविता अलगद पिशवीत भरून वनविभागाला याची कल्पना दिली. वनविभागाचे अधिकारी किशोर राउत राय यांसमक्ष अजगराला वनपरिक्षेत्रात मुक्त केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!