पनवेल दि.१५: अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे ज्येष्ठ नेते सी. सी. भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे ज्येष्ठ नेते सी. सी. भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगरसेवक अनिल भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, यांच्यासह महिला, युवा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेज येथे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सचिन पाटील, संस्थेचे विभागीय अधिकारी आर. पी. ठाकूर, भाजपचे कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, ऍड. आशा भगत, हॅप्पी सिंग, पीआरओ बाळासाहेब कारंडे, कार्यालय प्रमुख संतोष गुजर, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, अर्चना खाडे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गव्हाण येथे शांतादेवी दिव्यांग सामाजिक विकास संस्थेसाठी उभारलेल्या कार्यालयाला आज सदिच्छा भेट देऊन दिव्यांग बंधू भगिनी तसेच नागरिकांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे गाव कमिटी अध्यक्ष सुनिल कोळी, कोळी समाजाचे नेते विश्वनाथ कोळी, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जयवंत देशमुख, श्रीकांत घरत, हडकू कोळी, अशोक कोळी, जनार्दन कोळी, नामदेव कोळी, पांडुरंग कोळी, तसेच महिला वर्ग उपस्थित होते.