पनवेल दि.४: पनवेल परिसरातील सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेल्या केशवस्मृती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अमित ओझे, तर ज्योती कानिटकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
केशवस्मृती सहकारी पतसंस्थेची सन २०२२ ते २०२७ करीता पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून सर्व संचालक मंडळाची निवड बिनविरोध करण्यात आली. संचालकपदी अविनाश महादेव कोळी, अशोक वसंत नाईक, मकरंद वसंत बापट, अमित ओझे, ज्योती कानिटकर, सुबोध बाळकृष्ण भिडे, प्रतीक देवचंद बहिरा, प्रफुल्ल विठ्ठल म्हात्रे, माणिक गोविंदराव देवकांबळे, संगीता मनोजसिंग परदेशी, अंजली सुधीर सिधये यांची निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अमित ओझे, तर उपाध्यक्षपदी ज्योती कानिटकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीसाठी पनवेलचे सहाय्यक निबंधक बालाजी वाघमारे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!