अग्निपथ योजना; भरती संबंधित माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन !

पनवेल दि.०२: केंद्र सरकारच्या माध्यमातून युवांसाठी सैन्यदलांकरिता अग्निपथ योजना अंमलात आली असून या योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.
या योजनेसाठी पात्रता वय १७. ५ ते २१ वर्षं वयोगट असून पहिल्या वर्षी ४६ हजार जागा भरण्यात येणार आहेत. सेवा कालावधी चार वर्षं (प्रशिक्षण काळासह) असून वेतन दरमहा ३० ते ४० हजार हजार रुपये (लागू असल्यास स्वतंत्र भत्ता) तसेच दर वर्षी वेतनवाढ मिळणार आहे. या योजनेच्या अनुषंगाने कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सेवा निधी अंतर्गत करमुक्त ११ लाख ७१ हजार रुपये, सेवा काळात विशिष्ट प्रतीक चिन्ह, उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यास सैन्यदलांप्रमाणेच गौरव आणि पुरस्कार, ४८ लाख रुपयांचा विमा संरक्षण, सेवाकाळात मृत्यू झाल्यास कुटुंबाला अतिरिक्त ४४ लाख रुपये, अपंगत्व आल्यास एकरकमी १५ ते ४४ लाखापर्यंत अर्थसहाय्य असे फायदे मिळणार आहेत. सदरचा फॉर्म भरण्याची अंतिम तारिख ०५ जुलै २०२२ असून या योजनेच्या माहितीसाठी रोहित जगताप ८६९१९३०७०९ या क्रमांकावर तसेच पनवेल भाजप मध्यवर्ती कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.

error: Content is protected !!