आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून ३२ सायकलींची भेट
पनवेल दि.१६: आदिवासी समाजातील विद्यार्थिनींना शिक्षणात येणाऱ्या समस्या दूर करायच्या असेल तर त्यांना विद्यालयापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था झाली पाहिजे, या उद्दात्त हेतूने दीपावलीच्या सणानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर व भाजपच्यावतीने ३२ विद्यार्थीनींना वाजे येथे आयोजित कार्यक्रमात सायकल भेट देण्यात आली. त्यामुळे या विद्यार्थिनींच्या शिक्षणाला गती मिळाली आहे.
वाजे हायस्कूलमध्ये परीसरातील आदीवासी पाड्यांमधून अनेक मुली शिक्षणासाठी येतात. त्यांना हायस्कूलमध्ये येणे आणखी सुलभ व्हावे यासाठी दिवाळी सणानिमीत्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वतीने मुलींसाठी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विद्यार्थीनींची पायपीट थांबून त्यांचा वेळ वाचण्याबरोबरच प्रवासही आनंददायी होणार आहे.
त्यानुसार गाढेश्वर गावातील १०, देहरंग येथील ०८, वाजापूर येथील ०६, मनिकमाळ येथील ०३, धोदाणीमधील ०२, सांगटोली येथील ०२ आणि वापदेववाडीतील ०१ अशा ३२ विद्यार्थिनींना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यावेळी या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद व आभाराची भावना अधोरेखित झाली.
मुलींना भविष्यात शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागेल ती मदत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असलेल्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून करण्यात येईल. पैशावाचून कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू देणार नाही, अशी ग्वाही भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली. तसेच नेरे आणि रिटघरमध्येही आगामी काळात सायकल वाटप उपक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, मालडूंगे ग्रामपंचायतीचे सरपंच सिताराम पाटील, अध्यक्ष राजेश भोईर, वाजे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच पाटील, भगवानशेठ पाटील, सदस्य पद्माकर वाघ, गणेश शिद, नारायण भगत, राम पाटील, माजी सरपंच बेबी भगत, ताई चंदर भस्मा, धर्मा आंबो, विष्णु पारधी, वनिता वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते राघो वाघ, वाजे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील, माजी सरपंच राजेंद्र भालेकर, माजी सदस्य भोईर, प्रतिभा कातकरी, गौरी कातकरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!