पनवेल दि.१३: सिडकोच्या नैना प्रकल्पाविरोधात आज आदई ग्रामस्थ आणि नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने छेडण्यात आलेल्या आदई गाव बंद आंदोलनाला नागरिक, व्यापारी, रिक्षाचालकांसह टेम्पोचालकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांनीही १०० टक्के बंद पाळून नैना प्राधिकरणाचा निषेध केला.
यावेळी राजेश केणी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणत्याही स्वरूपात शेतकर्यांवर, येथील प्लॉटधारकावर अन्याय होऊ देणार नाही, ही भूमिका मांडली. नैना प्रशासन मोफत 60 टक्के जमीन घेऊन शेतकर्यांवर अन्याय करत असून, ही दडपशाही सहन केली जाणार नाही. शेवटच्या घटकाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष चालू राहील, अशा पद्धतीचा संदेश केणी यांनी दिला. अध्यक्ष वामन शेळके यांनी संपूर्ण पनवेल तालुका या लढ्यामध्ये सहभागी असल्याचे सांगितले. या आदई बंद आंदोलनात वामन शेळके, नामदेव फडके, राजेश केणी, सुभाष भोपी, बाळाराम फडके, विलास फडके, रमाकांत गरुड़े, किशोर पाटील, प्रभाकर शेळके, प्रभाकर केणी, गणू पाटील, सिताराम म्हसकर, शेखर शेळके, राम शेळके, जनार्दन शेळके, विश्वनाथ शेळके, कल्पना शेळके, माजी सरपंच अनिल ढवळे, जगदीश वाघमारे, हरीश शेळके, कबीर शेळके, लडकु पाटील, सखाराम म्हात्रे, विजय शेळके, शीशीर शेळके, राजेश पाटील, किशोर म्हात्रे, सत्या खांडे, राम पाटील, नारायण पाटील, कैलास पाटील, राम शेळके, शांताराम शेळके, जगन पारंगे, मनोहर शेळके, दिलीप भागवत, गजानन भागवत, अनंता भंडारी, बाबुराव शेळके, परशुराम शेळके, जनार्दन पाटील, नामदेव शेळके, प्रदीप म्हात्रे, दिलीप फुलोरे आदि उपस्थित होते.