पनवेल दि.24: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वतंत्र उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. याकरिता आदई गावातील तरुण पुढे सरसावले आहेत. संचार बंदी झुगारणाऱ्या नागरिकांना ग्रामस्थ सूचना करीत आहेत. अत्यावशक्य परिस्थिती उद्भवली तर पोलिसांना संपर्क केला जात आहे. याकरिता गावातील तरुण याठिकाणी पहारा देत आहेत. ग्रामस्थांना देखील बाहेर न पडण्याच्या सूचना या तरुणांनी केल्या आहेत. सायन पनवेल महामार्गा जवळ असलेल्या आदई गावात मोठ्या प्रमाणात फेरीवाले तसेच बाहेरील नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे काही स्थानिक होतकरू तरुणांनी हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचे पनवेलच्या महापौर कविता चौतमल यांनीही स्वागत केले आहे.