पनवेल दि.०५: पनवेल महानगरपालिका हद्दीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवणे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. याबाबतची आढावा बैठक महापौर, डॉ.कविता किशोर चौतमोल आणि आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस व महसुल विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या सभागृहात मंजूर झाला होता. या अनुषंगाने सुशोभीकरणाचे काम करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पुतळा हलविणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबधित संघटना आणि इतरांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला होता.
त्या अनुषंगाने आज महापौर, डॉ.कविता किशोर चौतमोल, आयुक्त, श्री.सुधाकर देशमुख व महापालिकेतील अधिकारी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला भेट दिली व तेथे चालू असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरण कामाची पाहणी करून आढावा घेतला. याबाबत यापुर्वी ठरल्याप्रमाणे पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलविण्याची कार्यवाही येत्या 3-4 दिवसांत केली जाणार आहे. सदरचा पुतळा हा सुरक्षितरित्या सदर ठिकाणाहुन महापालिकेच्या मालकीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथील इमारतीत साधारण 1 महिन्याकरीता आवश्यक सुरक्षा व्यवस्थेसह ठेवण्यात येणार आहे. सदर सुशोभिकरणाचे काम महिन्याभराच्या कालावधीत पूर्ण करून पुन्हा त्याच पुतळ्याची पुर्नस्थापना नव्याने होणाऱ्या चबुतऱ्यावर करण्यात येणार आहे. तरी याकामी सदरचे काम हे एक महिन्याच्या कालावधीमध्ये चालू राहणार असल्याने नागरीकांनी सहकार्य करावे तसेच कामाच्या ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!