पनवेल दि.3 (नितिन देशमुख ) पनवेल तालुक्यात 3 आणि महापालिका क्षेत्रात 3 पॉझिटिव्ह रुग्ण आज सापडल्याने तालुक्यात कोरोनाचे 110 रुग्ण तर महापालिका क्षेत्रात 93 रुग्ण झाले आहेत. आजच्या महापालिका क्षेत्रातील रुग्णामध्ये तिसर्‍यांदा गोवंडी येथील यू.एस.व्ही फार्मा कंपनीतील कामगाराचा समावेश असल्याने या कंपनीत निर्जंतुकीकरण आणि कमीत कमी उपस्थिती ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पनवेल महापालिका क्षेत्रात कळंबोली सेक्टर -2 ई येथील 63 वर्षीय व्यक्ति उपचारासाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात नेरूळ येथे गेली असता त्याठिकाणी तिला संसर्ग झाला आहे. तळोजा येथील 27 वर्षीय महिला कोरोंना पॉझिटिव्ह आली असून ती काही दिवसापूर्वी दहिसरहून तळोजा येथे माहेरी आली होती. तिचे पती कामानिमित्त तळोजा येथून रोज दहिसरला जात असतात. त्यांच्यामुळे तिला संसर्ग झाला असावा असा निष्कर्ष आहे. कामोठे येथील सेक्टर 36 मधील 34 वर्षीय व्यक्तिला कोरोनाचा संसर्ग झाला असून तो गोवंडी येथील यू.एस.व्ही फार्मा कंपनीत कामाला आहे. या कंपनीतील दोघांना आणि त्यांच्या घरातील व्यक्तींना यापूर्वी संसर्ग झालेला आहे. त्यामुळे कंपनीला निर्जंतुकीकरण आणि कमीत कमी उपस्थिती ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आज पर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील 1038 जणांची टेस्ट झाली असून त्यापैकी 18 जणांचे रिपोर्ट अद्याप यायचे आहेत. कोरोना पोझिटीव्ह पैकी 57 जणांवर उपचार सुरू असून 34 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आता पर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण मध्ये आज 3 नवीन रुग्ण सापडले आहेत. विचुंबे येथिल 39 वर्षीय साईनील सोसायटीतील मुंबईला महापालिकेत जाणार्‍या व्यक्तिचा रिपोर्ट कोरोना पोझिटीव्ह आला आहे. पाली देवद (सुकापूर) येथील 44 वर्षीय व्यक्ति आणि उलवे सेक्टर 8 मधील 73 वर्षीय व्यक्तिला आज कोरोंनाची लागण झाली आहे . आतापर्यंत ग्रामीण मध्ये 17 कोरोंना पॉझिटिव्ह झाले असून 5 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!