पनवेल दि.०१: भारतात आज तंत्रज्ञानातील नव्या 5G युगाचा आरंभ झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे 5G सेवेचा शुभारंभ केला असता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 5G सेवेच्या शुभारंभासाठी पनवेल नगरीत आले होते. महाराष्ट्रात ही सेवा सुरू करण्यासाठी राज्यातील तीन शाळांची निवड करण्यात आली होती. त्यात पनवेल महापालिकेच्या नवीन पनवेल मधील पोदी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेचा समावेश होता. यानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पोदी शाळेत उपस्थित राहून 5G सेवेचा शुभारंभ केला. तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अॅड मनोज भुजबळ, तेजस कांडपीळे, उपायुक्त सचिन पवार यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळाच्या नवरात्र उत्सवात दिली भेट

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!