पनवेल,दि.1: पनवेल महानगरपालिकेने सिडको हद्दीतील मालमत्ता धारकांना 31 जुलै पर्यंत शास्तीवरती 75 टक्के सवलत देऊ केली होती. या सवलतीचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यापुढे महानगरपालिका क्षेत्रातील सिडको हद्दीतील मालमत्ता धारकांना 30 सप्टेंबरपर्यंत शास्तीवरती 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.
मागील 24 जुलै ते 30 जूलै या एका आठवड्यात 10 कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. मागील आठवड्यात शास्तीवरील 75 टक्के सूटचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. महापालिकेच्या तिजोरीत आत्तापर्यंत 62 कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे.
महापालिकेच्यावतीने मालमत्ता कर ऑनलाईन पध्दतीने भरण्याकरिता PMC TAX ॲप सुरू केले आहे. तसेच ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी www.panvelcorporation.com किंवा www.panvelmc.org या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आले आहे
चौकट
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तळोजा औद्योगिक वसाहत,कळंबोली स्टील बाजार, पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता धारकांना मालमत्ता करांमध्ये महापालिकेने 30 सप्टेंबरपर्यंत 5 टक्के सवलत देण्यात आली आहे. या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी सवतलीचा लाभ घेऊन आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!