रायगड, दि.०४ : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ३२ रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण २७५३ मतदारांनी  गृह मतदानाचा हक्क बजावला असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी सांगितले आहे .
३० एप्रिलपासून मतदारसंघातील रहिवासी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या २३२४ ज्येष्ठ नागरिकांनी, ३८६ दिव्यांग मतदार यांनी प्रथमच घरबसल्या तसेच ४३ अत्यावश्यक सेवेतील मतदार यांनी टपाली मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात येऊन संबधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गृह मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी असंख्य ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!