मुंबई, दि. ६ : राज्यात गेल्या चार दिवसापांसून दररोज तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज ३५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के एवढे आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ३५ हजार ४४७ नमुन्यांपैकी २ लाख ११ ९८७ नमुने पॉझिटिव्ह (१८.६७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख १५ हजार २६५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ३५५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २०४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २०४ मृत्यू हे मुंबई मनपा-३९, ठाणे-६, ठाणे मनपा-१०, नवी मुंबई मनपा-२८, कल्याण-डोंबिवली मनपा-२, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी निजामपूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-५, वसई-विरार मनपा-१३, पालघर-१, रायगड-१, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-१३, अहमदनगर-१, धुळे-३, धुळे मनपा-२, जळगाव-१२, जळगाव मनपा-४, पुणे-३, पुणे मनपा-१३, पिंपरी-चिंचवड मनपा-२, सोलापूर-२, सोलापूर मनपा-५, सातारा-४, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद मनपा-७, जालना-५, लातूर-१, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड-१, अकोला-१, अकोला मनपा-२, अमरावती मनपा- १, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधित रुग्ण- (८५,२७०), बरे झालेले रुग्ण- (५७,१५२), मृत्यू- (४९३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,६२४)

ठाणे: बाधित रुग्ण- (४९,४८५), बरे झालेले रुग्ण- (१८,६७२), मृत्यू- (१३२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९,४८५)

पालघर: बाधित रुग्ण- (७८२३), बरे झालेले रुग्ण- (३११७), मृत्यू- (१४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५६६)

रायगड: बाधित रुग्ण- (६१०६), बरे झालेले रुग्ण- (२८९४), मृत्यू- (११०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१००)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (७२६), बरे झालेले रुग्ण- (४८३), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१५)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२४७), बरे झालेले रुग्ण- (१७९), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)

पुणे: बाधित रुग्ण- (२८,९९६), बरे झालेले रुग्ण- (१३,९७१), मृत्यू- (८८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४,१०६)

सातारा:  बाधित रुग्ण- (१३७४), बरे झालेले रुग्ण- (७९३), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२८)

सांगली: बाधित रुग्ण- (४६२), बरे झालेले रुग्ण- (२५४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (९४९), बरे झालेले रुग्ण- (७३३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०३)

सोलापूर: बाधित रुग्ण- (३२४१), बरे झालेले रुग्ण- (१७४१), मृत्यू- (३०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (११९६)

नाशिक: बाधित रुग्ण- (५४७८), बरे झालेले रुग्ण- (३१५९), मृत्यू- (२४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०७७)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (५८६), बरे झालेले रुग्ण- (३९०), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८०)

जळगाव: बाधित रुग्ण- (४४७३), बरे झालेले रुग्ण- (२५०६), मृत्यू- (२९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६७३)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (२०८), बरे झालेले रुग्ण- (१३९), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०)

धुळे: बाधित रुग्ण- (१२७४), बरे झालेले रुग्ण- (७२४), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (६८१२), बरे झालेले रुग्ण- (३००६), मृत्यू- (३०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५०५)

जालना: बाधित रुग्ण- (७५८), बरे झालेले रुग्ण- (३९७), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३३२)

बीड: बाधित रुग्ण- (१४९), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

लातूर: बाधित रुग्ण- (४४६), बरे झालेले रुग्ण- (२३२), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९०)

परभणी: बाधित रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२९७), बरे झालेले रुग्ण- (२५४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२)

नांदेड: बाधित रुग्ण- (४०९), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२८५), बरे झालेले रुग्ण- (१९३), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)

अमरावती: बाधित रुग्ण- (७०८), बरे झालेले रुग्ण- (४८१), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९६)

अकोला: बाधित रुग्ण- (१७०३), बरे झालेले रुग्ण- (१२२४), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८९)

वाशिम: बाधित रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (९३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (३१८), बरे झालेले रुग्ण- (१८२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (३४१), बरे झालेले रुग्ण- (२३८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९२)

नागपूर: बाधित रुग्ण- (१७५३), बरे झालेले रुग्ण- (१३१०), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२७)

वर्धा: बाधित रुग्ण- (१७), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३)

भंडारा: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (७८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१६९), बरे झालेले रुग्ण- (१०५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (९१), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१३९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४)

एकूण: बाधित रुग्ण-(२,११,९८७), बरे झालेले रुग्ण-(१,१५,२६२), मृत्यू- (९०२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१८),ॲक्टिव्ह रुग्ण-(८७,६८१)

(टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!