पनवेल दि.५: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि डॉ. डी. वाय. पाटील रक्तपेढीच्या सहकार्याने शुक्रवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते झाले, तर या शिबिराला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत रक्तदान केलेल्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
सीकेटी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत शुक्रवारी रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात १११ विद्यार्थी आणि शिक्षकांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराला उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक तेजस कांडपिळे, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, डॉ. डी. वाय पाटील रक्तपेढीच्या डॉ. प्राची नायर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, आयक्युएसी समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रूसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर, कलाशाखाधिपती डॉ. बी. एस. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे शाखाधिपती डॉ. एस. बी. यादव, विज्ञानशाखेच्या शाखाधिपती डॉ. ज्योत्स्ना ठाकूर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सूर्यकांत परकाळे, कार्यक्रम अधिकारी गणेश साठे, सत्यजित कांबळे, डॉ. योजना मुनिव, अपूर्वा ढगे, आकाश पाटील आदी उपस्थित होते. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सीकेटी विद्यालयात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!