पनवेल दि.2 (नितिन देशमुख) पनवेल महापालिका क्षेत्रात 9 आणि तालुक्यात 2 असे एकूण 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आजच्या रुग्णामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाऊन पॉझिटिव्ह झालेल्यांच्या घरातील 7 रुग्णांचा समावेश आहे. गोवंडी येथील यू.एस.व्ही फार्मा कंपनीतील कामगार व त्यांच्या घरातील व्यक्तींचा समावेश आहे पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोंनाचे आता 90 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत. ग्रामीण मध्ये नवीन रुग्ण नसल्याने पनवेल तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 104 झाली आहे.
आजच्या पॉझिटिव्ह मध्ये 7 कामोठे, 1 नवीन पनवेल आणि कळंबोली मध्ये 1 चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पूर्वीच्या कोरोंना पॉझिटिव्हच्या घरातील 7 जणांचा समावेश आहे. तर एकाला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा शक्यता आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कामोठे मध्ये आज 7 रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यापैकी सेक्टर 7 मधील रुग्णाचे वडील मुंबईत सफाई कामगार असून त्यांना कोरोंनाची लागण झाली होती. सेक्टर 7 मधील महिला मुंबईला सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये नर्स आहे. सेक्टर 21 मधील 33 वर्षीय महिला आणि तिची 7 वर्षीय आणि 1 वर्षीय मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेचा पती गोवंडी येथील यू.एस.व्ही फार्मा कंपनीत कस्टमर व्यवस्थापक आहे. त्याचा रिपोर्ट कोरोंना पॉझिटिव्ह होता. सेक्टर 11 मधील 32 वर्षीय महिलेचा भाऊ मुंबईला महानगरपालिकेत सफाई कामगार असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होता. सेक्टर 34 मधील 36 वर्षीय व्यक्ति गोवंडी येथील यू.एस.व्ही फार्मा कंपनीत कामाला आहे. या कंपनीत कोरोंना पॉझिटिव्ह असल्याने त्या ठिकाणीच त्याला संसर्ग झाला असावा.
नवीन पनवेल सेक्टर 17 मधील 22 वर्षीय महिला मेंदू विकाराच्या तपासणीसाठी मुंबईला सायन हॉस्पिटल मध्ये गेली असताना तिला संसर्ग झाला असावा. कळंबोली सेक्टर 4 मधील; 35 वर्षीय व्यक्तिचा भाऊ पोलिस कर्मचारी असून त्याच्यामुळे याला संसर्ग झाला असावा. शनिवार पर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील 1010 जणांची टेस्ट केली आहे. त्यापैकी 64 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोंना पोझिटीव्ह पैकी 56 जणांवर उपचार सुरू असून 32 जण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आता पर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण मध्ये शनिवारी 2 नवीन रुग्ण सापडले आहेत. उसर्ली येथिल मोरया सोसायटीतील मुंबईला फार्मा कंपनीत जाणारी व्यक्ति आणि विचुंबे येथील मोरया पार्क मधील मुंबईला सफाई कामगार असलेलली एक व्यक्ति कोरोंना पॉझिटिव्ह झाली आहे. तालुक्यात कोरोंना पोझिटीव्ह रुग्णांची संख्या 104 झाली असून पनवेल ग्रामीण मध्ये14 पैकी 5 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गोवंडी येथील यू.एस.व्ही फार्मा कंपनीतील कामगारांना कोरोंनाची लागण झाल्याचे दिसत असल्याने या कंपनीतील कामगार आणि त्यांचे नातेवाईक भयभीत झाले आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!