आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश
पनवेल दि.२३: नवी मुंबई व पनवेल तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या दोन्हीबाजूने १०३.२१ कोटी रुपयांचा सर्विस रोड व अंडरपास केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. यामुळे या परिसरातील विकासाला अधिक चालना मिळणार असून याकामी आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी आणि पाठपुरावा कामी आला आहे.
नवी मुंबई व पनवेल तालुक्यातून मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग म्हणजेच दिल्ली मुबई कॉरिडॉर हा जेएनपीटीला तथा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पोहोचणार आहे. सदर मुबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग बदलापूर नंतर पनवेल तालुक्यातील शिरवली, चिंध्रण गावाजवळून मोरबे सर्कलपर्यंत आलेला असून त्यापुढे तो महाराष्ट्र शासनाच्या विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरीडॉरला जोडलेला आहे. मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग म्हणजेच दिल्ली-मुंबई कॉरीडॉर पनवेल तालुक्यातील मौजे वांगणी तर्फे तळोजे, शिरवली, चिंचवली तर्फे तळोजे, आंबे तर्फे तळोजे व मोरबे इत्यादी गावातून जातो. या सर्व गावातील रहिवाशांना व विविध प्रकल्पांना दळणवळणाच्या दृष्टीने या द्रुतगती महामार्गाचा फायदा व्हावा, या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूने सर्व्हिसरोड व अंडरपास तसेच इतर विविध मागण्या केलेल्या होत्या. याबाबत दिनांक ३० ऑगस्ट २०२१ रोजी नितीन गडकरी यांना पत्र देण्यात आले होते. तसेच आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेटही घेतली होती. त्याचबरोबर या दोन्ही लोकप्रतिनिधींनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यामार्फत अर्थात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, नवी दिल्ली, (एनएमआय) ने मागणी मान्य केली आहे. त्यानुसार ४.०१८ किमी लांबीचा सर्विसरोड चेनेज ७५ +७६५ पासून ७९+७८३ पर्यंत मंजूर केलेला आहे. याकामी अंदाजीत १०३.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या सर्विस रोडमुळे नैना व परिसराच्या विकासाला मोठया प्रमाणात चालना मिळणार आहे. त्यामुळे स्थानिक जनतेच्यावतीने आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्र शासन व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धन्यवाद देत आभार मानले आहेत.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!