पनवेल दि.११: रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे उभारण्यात येत असलेल्या ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ नूतन वास्तूचे काम प्रगती पथावर व शेवटच्या टप्प्यात असून या कामाची लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी (मंगळवार, दि. ०५)पाहणी केली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, ठेकेदार, आर्किटेक आदी उपस्थित होते.