दत्ताराम म्हात्रे,सदानंद राणे, गणेश कोळी,डॉ.निलेश होळ, अंशुमन विचारे,मेघा घाडगे, नागेश कोळी यांना पुरस्कार
पनवेल दि.११: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचे महाराष्ट्र लोक गौरव पुरस्कार महाराष्ट्र लोक कलावंत प्रतिष्ठानचे सचिव विनोद सदाशिव नाखवा यांनी जाहीर केले आहेत.
ठाणे येथे महाराष्ट्र लोक कलावंत प्रतिष्ठानच्यावतीने महाराष्ट्र शाहिरी लोक महोत्सव २०२४ हा डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,ठाणे येथे साजरा होत आहे, या महोत्सव कार्यक्रमात लोक गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये दत्ताराम म्हात्रे ( शाहीर), सदानंद राणे (लोक कलावंत), गणेश कोळी (ज्येष्ठ पत्रकार), निलेश होळ (डॉक्टर), अंशुमन विचारे (सुप्रसिद्ध अभिनेते), मेघा घाडगे (लावण्यवती), नागेश कोळी (कॅरेनेट) यांचा समावेश आहे.
शुक्रवार १२एप्रिल २०२४रोजी रात्रौ ८ वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे हा समारंभ होणार असून या समारंभासाठी शिक्षणमहर्षी डॉ.नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला,सुप्रसिद्ध अभिनेते संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते राजेश मढवी,माजी नगरसेवक संजय तरे, दूरदर्शन निर्माता पंचभाई,माजी नगरसेवक गिरीश राजे,एकविरा देवी ट्रस्ट ढोकाळीचे विश्वस्त रत्नाकर पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात दिग्दर्शक विनोद नाखवा यांच्या एकवीरा देवी प्रोडक्शन कलाविष्कार निर्मित कोळीबाणा- मी डोलकर दर्याचा राजा या कोळी जीवनावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!