मुंबई दि.२८: ज्या शिवतीर्थावर महाराष्ट्राचे महानेते बाळासाहेब ठाकरे यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्याच शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.